दैनिक स्थैर्य । दि. 30 नोव्हेंबर 2021 । फलटण । फलटण शहरामध्ये विविध भागामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा सातत्याने होत आहे. यापूर्वी अनेकदा नगरपालिकेमध्ये तोंडी व लेखी निवेदने अनेकदा दिलेले आहेत. दूषित पाणीपुरवठा झाल्याने फलटण शहरामध्ये साथीचे आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. पाणी पुरवठा व पाणी शुद्धीकरणासाठी पालिकेने वारंवार लाखो रुपये खर्च केलेले आहेत. तरीसुद्धा दूषित पाणी पुरवठा होत आहे. ह्या अश्या कारणामुळे उद्या दि. ०१ डिसेंबर रोजी नगरपालिकेतील पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दूषित पाणी भेट देणार आहे, असे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमीर शेख यांनी स्पष्ट केले.