दूषित पाण्यामुळे उरमोडी नदीचे पात्र दूषित


स्थैर्य, सातारा, दि. 15 : दूषित पाण्यामुळे उरमोडी नदीचे पात्र दूषित झाले आहे. या पाण्यामुळे नागठाणे, बोरगाव, अतीत, माजगाव इत्यादी गावातील नदीकाठावर शेकडो मासे व जलचर प्राणी मृत्यु मुखी पडले आहेत.उरमोडी नदीच्या दोन्ही काठाना आशा माशांचा अक्षरशः खच पडला आहे.या दूषित पाण्याला प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.उरमोडी नदीतून काठावरच्या नागठाणे, अतीत,माजगाव इत्यादी अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या पाणी पुरावठय़ावर या गोष्टींचा परिणाम झाला आहे. या मुळे नागठाणे, अतित सह इतर गावच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच नदीचे हे पाणी जनावरे पित असल्यामुळे त्यांच्याही जीवितास  धोका पोहचू शकतो.

तरी संबंधित यंत्रणेने या सर्व गावातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून नदीतील पाणी का दूषित झाले? याचा योग्य तो तपास करून कारवाई करावी अशी या सर्व नदीकाठच्या गावातील नागरिकांची मागणी आहे अन्यथा आंदोलन करण्याची वेळ येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!