कंटेनरची एसटीला धडक; वाढेफाटा येथील घटना


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । सातारा । पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर कंटेनरने एसटीला धडक दिल्याने एसटीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने एसटीतील प्रवाशांना कोणतीही जखम झाली नाही. हा अपघात १२ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एसटीचालक विनय कृष्णाजी थोरात वय ४५, रा. बलकवडे, ता. तासगाव, जि. सांगली हे सांगलीहून पुण्याला एसटी घेऊन निघाले होते. ते वाढे फाट्यावर एसटी घेऊन आले असता कंटेनरने एसटीला पाठीमागून जबर धडक दिली. यामध्ये एसटीचे काच फुटून उजव्या बाजूचे नुकसान झाले. कंटेनरचालक अशपाक बशीर बकापूर रा. हुबळी, जि. धारवाड, राज्य कर्नाटक याने निष्काळजीपणे वाहन चालवून एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी चालक बशीर बकापूर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Back to top button
Don`t copy text!