ग्राहकांनी लोकशिक्षणाच्या माध्यमातून जागृत होणे गरजेचे – जिल्हाधिकारी शेखर सिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । सातारा । सध्या ऑनलाईन बाजार व्यवस्था विस्तारत असताना ग्राहकांनी लोक शिक्षणाच्या माध्यमातून जागृत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मिलिंद पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, उपनियंत्रक वैद्यमापनशास्त्र ज्योती पाटील, सह जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश जाधव, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कै.सौ. अरुंधती अरविंद ढवळे,ज्युनिअर कॉलेज कन्याशाळा सातारा येथील विद्यार्थीनींमार्फत  जागो ग्राहक जागो  या विषयावर सादर करण्यात आलेल्या पथनाट्याचे कौतुक करुन   जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ग्राहकांना त्यांच्या हक्का विषयी जागृत करण्यासाठी लोककलेचा व अन्य स्तरावर माहिती प्रसार करुन ग्राहकांपर्यंत माहिती पोहचविल्या ग्राहक कायद्याचा उद्देश पूर्ण करण्यात येईल. विविध माध्यमातून ग्राहकांना हक्काबाबत जागृत करण्याचे प्रयत्न सर्वांनी करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी ग्राहकांच्या हक्काबाबत मार्गदर्शन केले.जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडून पुरविल्या जाणाऱ्या ग्राहक सेवेबद्दल सविस्तर माहिती दिली. उपनियंत्रक वैद्यमानपशास्त्र ज्योती पाटील यांनी वजने, मापे या संदर्भात ग्राहकांनी कशी जागृतता दाखविली पाहिजे याबाबत माहिती दिली.

माहे जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात बहुमुल्य मदत केलेल्या संघटनांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!