महायुतीच्या सोबत म्हणजेच राष्ट्रवादीच्या घड्याळासोबत बांधकाम कामगार राहतील : जयकुमार शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या घड्याळ चिन्हाच्या सोबत बांधकाम कामगार ठामपणे राहतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे दौरा करीत आहेत; त्यावेळी जयकुमार शिंदे बोलत होते.

फलटण तालुक्यासह राज्यातील बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य व केंद्र शासनाच्या वतीने विशेष योजनांचा लाभ मिळाला आहे. यासोबतच तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना ह्या आहेत. त्या पुढे अखंडित पणे सुरू ठेवण्यासाठी व त्याचा लाभ हा सर्वसामान्य नागरिकांना होण्यासाठी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या घड्याळ ह्या चिन्हाच्या समोर बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले.

यावेळी दौऱ्यामध्ये बांधकाम कामगार संघटनेचे नेते शरद झेंडे, अमित गायकवाड, रमेश भंडारी, वस्ताद जाधव, योगी विकास मोरे हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!