दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2024 | गोखळी | बिल्डर असोसिएशन ऑफ इंडीया व शिर्के समूह यांच्या वतीने बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विश्वनाथन यांच्या हस्ते देण्यात आला आहे. निवासी बंगला प्रकल्प व व्यावसायिक संस्था इमारत उभारणी संवर्गातील दोन मानाचे पुरस्कार गोखळी गावचे सुपुत्र, बारामतीचे बांधकाम व्यावसायिक उध्दव गावडे यांना प्राप्त झाले आहेत.
वेल बिल्ट स्ट्रक्चर स्पर्धेत दरवर्षी राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना विविध पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा निवासी बंगला प्रकल्प श्रेणीमध्ये उध्दव गावडे यांनी त्यांच्या साकारलेल्या बंगल्यास आणि त्यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या भिगवण, चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार शाळेच्या इमारतीस पुरस्कार देऊन गौरविले आहे.
बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या समितीने या दोन्ही बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करुन या बांधकामाची गुणवत्ता, उभारणीचा वेग, सुरक्षितता, आर्थिक व्यवहार्यता, सुरवातीपासून कागदपत्रांची केलेली पूर्तता, नियमांचे केलेले पालन, बांधकामातील नवीन तंत्रज्ञानाचा केलेला वापर, बांधकाम कर्मचाऱ्यांचे आरोग्य व स्वच्छता यासाठी केलेली तरतूद, ग्रीन बिल्डींग संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केलेले प्रयत्न या बाबींचा विचार करुन पुरस्कार जाहीर केलेले आहेत.
उध्दव सोपानराव गावडे हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बारामतीत बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केले असून बारामती शहराच्या वैभवात भर घालतील अशा इमारती उभारल्या आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी बांधकाम व्यवसायात भरारी घेतली आहे.
बारामती सहकारी बँकेचे संचालक, फलटण तालुका वारकरी संघटना माजी तालुकाध्यक्ष स्वर्गीय हभप सोपानकाका गावडे यांचे चिरंजीव आहेत पुरस्कार प्राप्त झाले बद्दल उद्धवसाहेब गावडे यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, फलटण – कोरेगावचे आमदार सचिन पाटील आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांन कडून अभिनंदन होत आहे.