डोंबिवली येथील खोणी आणि शिरढोण गावात म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांचे काम प्रगतीपथावर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील खोणी आणि शिरढोण गावात म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात  येणा-या सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून त्या लवकरच पूर्ण होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील खोणी आणि शिरढोण गावात म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांचा ताबा मिळण्याबाबत विधानसभा सदस्य कालिदास कोळंबकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील खोणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ६ हजार ३३८ घरकुलांना केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने २८ एप्रिल २०१६ ला मान्यता दिली. प्रत्यक्ष जमिनीचा ताबा २० ऑक्टोबर २०१७ ला मिळाला. त्यानंतर  मंजूर अभ्यन्यासातील  १६ इमारतीतील ४ हजार ४४८ अत्यल्प उत्पन्न गटातील घरकुलांचे बांधकाम जानेवारी २०१८ पासून हाती घेण्यात आले. ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशनची ही योजना असल्यामुळे या योजनेची लॉटरी काढण्यात आली आणि वेगवेगळया ट्प्प्यांवर त्याचे पैसे भरणे आवश्यक होते.  या सोडतीमध्ये यातील  यशस्वी १ हजार ४४६  लाभार्थींपैकी  २३८ लाभार्थींनी १०० टक्के रक्कम भरली १८७ लाभार्थींनी  पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम भरली. यातील आठ इमारती २०२४ या वर्षी पूर्ण होणार आहेत तसेच काही इमारतीना भोगवटा प्रमाणपत्र मिळाला आहे. शिरढोण येथील काही इमारती २०२२ मध्ये पूर्ण होतील. कोरोनाच्या काळात सर्व प्रकारची बांधकामे बंद असल्यामुळे ही कामे बंद होती. ही कामे आता सुरू असून लवकरच पूर्ण होतील अशी महिती उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

000


Back to top button
Don`t copy text!