
स्थैर्य, सातारा, दि. 17 सप्टेंबर : नवरात्रोत्सवानिमित्त सातारा शहरातील मोती चौकातील देवी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आईसाहेब अर्थात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज दुर्गादेवी उत्सवाच्या मंडप उभारणीचा वेग आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त याठिकाणी आकर्षक हेमाडपंथी मंदिराच्या पार्श्वभूमीवर सुसंगत सजावटीने हा मंडप बहरला जाणार आहे. (छाया : अतुल देशपांडे, सातारा)

