फलटण नगरपरिषदेमार्फत मंजूर २१९ पैकी १३० घरकुलांची बांधकामे पूर्ण; मुख्याधिकारी निखिल मोरे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२४ | फलटण |
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी फलटण नगर परिषदेमार्फत सुरू आहे. या योजनेंतर्गत फलटण नगर परिषदेस एकूण ०४ सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर असून यामध्ये २१९ घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. सर्व मंजूर घरकुलांपैकी १३० घरकुलांची बांधकामे पूर्ण झालेली असून उर्वरित घरकुलांची बांधकामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेंतर्गत मंजूर घरकुलांना आत्तापर्यंत बांधकामाच्या टप्प्यानुसार ३,०९,००,०००/- रुपये इतके घरकुल अनुदान तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना (शहरी) या योजनेअंतर्गत १७,२५,०००/- इतके अनुदान वितरीत करून अर्थसहाय्य करण्यात आलेले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ६७ लाभार्थींना दि.०७/०८/२०२४ रोजी घरकुलाच्या तिसर्‍या हप्त्याचे रक्कम रु.३९,८०,०००/- व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना (शहरी) या योजनेमधील लाभार्थीना घरकुलाचे ६,५०,०००/- इतके अनुदान फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले आहे.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)


Back to top button
Don`t copy text!