मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास नेण्याचा बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंचा मानस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 01 जानेवारी 2025 | मुंबई | राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, राज्याची सर्वांगीण प्रगती ही पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून, चुकीच्या पद्धतीने काम होत असेल किंवा जमीन हस्तांतरणात अडचणी येत असतील तर त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.


Back to top button
Don`t copy text!