दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२३ । मुंबई । दि.२८ जून २०२३ रोजी आषाढी एकादशी दिनी पंढरपूर येथे बार्टी चे संविधान दिंडीचा समारोप राज्याचे कामगार मंत्री तथा माजी सामाजिक न्याय मंत्री मा.श्री.सुरेश खाडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न.यावेळी विशेष उपस्थिती म्हणून श्री.मोहन वानखडे,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा संघटना मंत्री व श्री.सुनीलजी सर्वगोडजी यांचे उपस्थिती मध्ये झाले. यावेळी श्री.खाडे महोदयांनी,सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्थेने उत्कृष्ट उपक्रम नियोजित केलेबाबत बार्टीच्या महासंचालक श्री.सुनील वारे व समतादूत विभागाचे विशेष कौतुक केले.असे उपक्रम भविष्यात देखील हाती घ्यावे असे बार्टी संस्थेस सूचित केले.
सचिव,श्री.सुमंतजी भांगे ( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन ) यांच्या मुख्य संकल्पनेतुन व आयुक्त,डॉ. प्रशांतजी नारनवरे (समाज कल्याण पुणे) व महासंचालक श्री. सुनील वारे (बार्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे यांचेमार्फत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या बरोबर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या “संविधान दिंडी” चे आळंदी ते पंढरपूर आयोजन करण्यात आले होती.
महाराष्ट्रातील आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आषाढी वारीस दिनांक ११ जून पासून सुरुवात झाली होती.यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल होत्या. वारकरी दिंडी समवेत बार्टी ची संविधान दिंडी सोबत “संविधान रथ” देखील सज्ज झाला होता.आषाढी वारी पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांचा – प्रचंड उत्साह दिसून आला.पालखी सोहळा मध्ये दिंडेकरी, फडकरी,सेवेकरी पंढरपूर नगरीत माउलीच्या सोहळ्यासाठी सजली होती. राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिड्या पंढरपूर येथे दाखल होत्या.पंढरपूर संस्थान कमिटी तसेच प्रशासन,पोलीस यंत्रणाचे काटेकोर उत्कृष्ट नियोजन यावर्षी होते.
बार्टीकडून पालखी सोहळ्यात संविधान दिंडीच्या माध्यमातून संविधान विषयांवर तसेच संत महापुरुष विचारांवर जनजागृती करण्यात आली.यावेळी ‘बार्टी’ कडून संविधान विषयक प्रबोधन करण्यासाठी “संविधान रथ” सजऊन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
तमाम लाखो वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी,आपले अधिकार,कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू आहे. भारतीय संविधानाबद्दल तीन प्रश्न विचारून विजेत्यांना भारतीय संविधानाची प्रत,संविधान प्रास्ताविका भेट देऊन दिंडीत सन्मानित करण्यात आले.वारकरी बांधवांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाटप करून त्यांना भारतीय संविधानाबद्दल आपल्या मूलभूत अधिकार व कर्तव्याची माहिती देण्यात येत आहे.
नागरिकांना संविधानाच्या प्रास्ताविकाचे व बार्टी घडी पत्रिकेचे वाटप करून संविधान दिंडीचे महत्त्व विशद केले. संविधान चित्ररथास वारकऱ्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वारकरी दिंडी च्या मार्गाने वारकऱ्यांच्या विसाव्या ठिकाणी प्रबोधनात्मक, संविधान आधारित विविध उपक्रम, कार्यक्रम,शाहीरी जलसा यांचे आयोजन करण्यात आले.
संविधान दिंडीचा समारोप करण्याकरिता माननीय कामगार मंत्री, मा.श्री.सुरेशभाऊ खाडे साहेब यांचे स्वागत बार्टी प्रतिनिधी श्रीम.नसरीन तांबोळी सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक समतादूत विभाग यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरी निर्माते प्रबोधनसम्राट सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधन कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी उपस्थित श्री.सुनिल सर्वगोड (संघटन सचिव रि.पा.ई.) महाराष्ट्र राज्य,श्री.जितेंद्र बनसोडे प.महाराष्ट्र सरचिटणीस रि.पा.ई. , श्री.अरविंद कांबळे जि.उपाध्यक्ष रि.पा.ई.,श्री.एड.किर्तीपाल सर्वगोड रि.पा.ई. शहराध्यक्ष पंढरपूर,श्री.श्रीकांत कसबे संपादक जोशाबा.,श्री.मुकुंद मागाडे,श्री.नागेश रणदिवे,श्री.आर.पी.कांबळे,श्री.विशाल मांदळे रि.पा.ई.युवक अध्यक्ष पंढरपूर इ.मान्यवरांचे तसेच संविधान दिंडीस सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी तसेच वारकऱ्यांचे बार्टी तर्फे आभार मानून कार्यक्रमचा समारोप संपन्न झाला.
संविधान दिंडीमध्ये बार्टीचे निबंधक इंदिरा आस्वार, विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल भोसले,डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण,श्रीम.ऋषली शिंदे, श्री. रवींद्र कदम ,श्रीमती.आरती भोसले, श्री.सतीश पाटील,श्री.अनिल कारंडे, कार्यालयीन अधीक्षक सचिन जगदाळे व श्रीमती संध्या नारखेडे , सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी,प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे,प्रकल्प अधिकारी श्री.विजय बेदरकर अकोला जिल्हा प्रकल्प अधिकारी व समतादूत इ.समावेश होता.
समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टी सहा.प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती नसरीन तांबोळी,सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी विजय पी.बेदरकर तसेच आभार प्रदर्शन समतादूत श्रीमती राजश्री कांबळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रणिता कांबळे राहुल कवडे श्री.मनोज खंडारे,श्रीमती तेजस्वी सोनवणे,श्रीमती विशाखा सहारे व श्रीमती उषा भिंगारे तसेच सोलापूर जिल्हा समतादूत राजेश्री कांबळे, अस्विनी सुपाते, नालंनदा शिंदे, किरण वाघमारे, यशपाल चनंदशिवे, मुकुंद लोंढे, अनुराधा पंडित, जोती ओव्हल यांनी परिश्रम घेतले.