भारतामध्ये कोविड-19 रूग्णांच्या बरे होण्याचा सातत्याने चढता आलेख ; गेल्या 24 तासांमध्ये सर्वोच्च विक्रम- 73,642 रूग्ण बरे होवून परतले


स्थैर्य, सातारा, दि.७: संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 रूग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सलग दुस-या दिवशीही देशातले 70,000 पेक्षा जास्त रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये भारतामधले 73,642 रूग्ण बरे झाले आहेत. यापैकी काही रूग्ण आपल्या घरांमध्ये विलगीकरणामध्ये होते, तेही बरे झाले आहेत.

देशांमध्ये कोविड -19 चे आत्तापर्यंत जवळपास 32 लाख रूग्ण (31,80,865) पूर्ण बरे झाले आहेत. दररोज कोरोनाचे रूग्ण वाढत असले तरीही बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 77.32 टक्के आहे.

कोविड-19 लढा जिंकण्यासाठी केंद्र आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांची सरकारे समन्वयाने प्रयत्नशील आहेत. देशभरामध्ये मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात येत असल्यामुळे संक्रमणाच्या प्रारंभीच्या टप्प्यामध्ये रूग्ण आढळला तर त्याच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत. तसेच सौम्य संक्रमण असलेल्या रूग्णांना घरामध्ये विलगीकरणात ठेवून उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयांमध्ये कोविड-19 उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या मानक उपचार पद्धतीनुसार औषधोपचार, चाचण्या केल्या जात आहेत. तसेव नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयाच्यावतीने कोविड समर्पित रूग्णालयांच्या अति दक्षता विभागांमध्ये कोविड-19 रुग्णांचे कशा पद्धतीने व्यवस्थापन केले जावे, यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. या उपायांमुळे अधिकाधिक लोकांचे प्राण वाचण्यासाठी मदत झाली आहे. जागतिक स्तराचा विचार करता कोविड मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होत आहे. सध्या भारताचा कोविड मृत्यूदर 1.72 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

भारतामध्ये सक्रिय रूग्णांचे प्रमाणही कमी होत आहे. आत्तापर्यंतच्या (8,62,320) सकारात्मक प्रकरणांपैकी केवळ 20.96 टक्के सक्रिय रूग्णांचे प्रमाण आहे.

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/आणि @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in आणि @CovidIndiaSeva .

कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (टोल फ्री). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!