
स्थैर्य, सातारा, दि. 20 डिसेंबर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांचा मनमानी कारभार सुरू आहे. कर्ज प्रस्तावाचे एल वाय प्रमाणपत्र नाकारण्याचे उद्योग करून लाभार्थी कमी करण्याचा आणि महामंडळाला अडचणीत आणण्याचे षडयंत्र सुरू आहे, असा गंभीर आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस अजित राष्ट्रवादी पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी व्यवस्थापकीय संचालकांना महामंडळास अडचणीत आणण्याची सुपारी दिल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, त्यांनी ही बाब गांभीयनि घेतली नाही, तर महामंडळातून बाहेर पडण्याचा इशारा श्री. पाटील यांनी दिला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व व्यवस्थापकीयसंचालक विजयसिंह देशमुख यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. या वादाचे मूळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळच असल्याचेही श्री. पाटील यांचा आरोप आहे. यासंदर्भात आज त्यांनी सातार्यात पत्रकारांशी संवाद साधला.
श्री. पाटील म्हणाले, महामंडळाच्या समिती सदस्यांच्या बैठकीत कोणत्याही बाबींवर धोरणात्मक चर्चा होऊनच मान्यता दिली जाते; पण व्यवस्थापकीय संचालकांनी संगणक अद्ययावतीकरणांच्या नावाखाली नवीन उद्योजकांच्या कर्जाची एलवाय प्रस्ताव नाकारण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये समितीच्या कोणत्याही परवानगी घेतलेली. व्यवस्थापकीय संचालक स्वतःच्या स्वाक्षरीने महामंडळाचे प्रशासन चालवत आहेत. उपसमितीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालकांना एका बैठकीत सूचना देऊनही त्यांच्या वागण्यात फरक पडलेला नाही.
येत्या सोमवारी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या गंभीर प्रकाराची माहिती देणार आहे. मराठा समाजाची नवोद्योजक त्यांना मिळणारे कर्ज, त्यावरील व्याज महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जाचे प्रस्ताव आणि त्याचे एलवाय प्रमाणपत्र कसे रद्द करायचे याचा घाट घातला जात आहे. व्यवस्थापकीय संचालकांच्या मनमानीपणाला मराठा उद्योजक वैतागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा मराठा समाजासाठी उपयुक्त ठरणार्या सारथी महामंडळाच्या अनेक योजना कमी केल्या आहेत. त्यामुळे ते सुद्धा बहुतेक या षडयंत्रात सामील आहेत का, असाही प्रश्न श्री. पाटील यांनी उपस्थित केला आहे.

