पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । मुंबई । पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता पूर  नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोलीवर्धायवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भुषण गगराणीप्रधान सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव (बांधकाम) मनोज  सौनिकअपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीरमदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ताअपर मुख्य सचिव (गृह) आनंद लिमयेप्रधान सचिव पाणीपुरवठा तथा पालक सचिव यवतमाळ संजीव जयस्वालप्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारेप्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवलेचंद्रपूरचे पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव (सहकार) अनुपकुमार यादवपालक सचिव वर्धा तथा अपर मुख्य सचिव (अल्पसंख्यांक) जयश्री मुखर्जीगडचिरोलीचे पालकसचिव तथा गृहनिर्माणचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकरएनडीआरएफचे कमांडंट आशिष कुमारएसडीआरएफचे अतिरिक्त महासंचालक चिरंजीव प्रसादविभागीय आयुक्त अमरावतीनागपूर तसेच गडचिरोलीचंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारीजि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेगडचिरोलीवर्धायवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात आपत्ती विषयक मदत व बचाव कार्यासाठी असलेल्या यंत्रणा  क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहेत. त्याचा दररोज आढावा  मी स्वत: घेत आहेच. पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव वाढू नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तत्काळ खबरदारी घ्यावी. नद्यांची पात्रे गाळ साचल्यामुळे उथळ झाली आहेत. पात्रांचे खोलीकरण व रूंदीकरण केल्याने नद्यांचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी मदत होईल यासाठी जलसंपदा विभागाने नदया तसेच धरणे यातील गाळ काढण्याबाबत योग्य त्या कायमस्वरूपी  उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री.‍शिंदे म्हणालेपूरग्रस्त भागात पूरामुळे ज्या नागरिकांचा मृत्यू ओढवला त्यांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत वितरीत झाली आहे. तरीही जे लोक या आपत्तीत जखमी असून उपचार घेत आहेत त्यांच्यावर उपचार देखील वेळेत होण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी. पूरग्रस्त भागातील शेती तसेच इतर नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून त्याचे प्रस्ताव शासनाला सादर करा. कोणताही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी. राज्यात पावसामुळे झालेल्या 109 मृत्यू पैकी साठ टक्के मृत्यू हे वीज पडून झालेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात  अंगावर वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी प्रतिबंधक यंत्रणा ही देखील प्रभावीपणे राबविण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मदत व पुनर्वसन विभागाने काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी बैठकीत केल्या.

यावेळी गडचिरोलीचंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात पूरस्थिती तसेच मदत व बचावकार्याची सविस्तर माहिती बैठकीत दिली.


Back to top button
Don`t copy text!