पानीपत’पूर्वीच कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज – हेमंत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । मुंबई । देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे.पंरतु,देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या ‘कॉंग्रेस’चा मोलाचा वाटा होता तो पक्ष आता नेतृत्वाअभावी गलीतगात्र झाला आहे.या राष्ट्रीय पक्षाला त्यामुळे आत्मचिंतनाची आवश्यकता आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी व्यक्त केले. संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. पंरतु,नेतृत्व अभावामुळे गेल्या आठ वर्षांपासून कॉंग्रेसची ‘ग्राउंड पातळी’ वरील पकड सुटत चालली आहे. पक्षात जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बराच अभाव असल्याने सर्वसामान्यांना सोबत असलेली नाळ तुटत चालली आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

युपीएच्या काळात कॉंग्रेसची बाजू कणखरपणे प्रसार माध्यमांसमोर मांडणारे दिग्विजय सिंह सध्या कुठे दिसत नाही. ते कुठे आहे याचा शोध पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेवून त्यांना मीडियासमोर आणावे,असा उपरोधक टोला देखील पाटील यांनी लगावला. पक्षाचे अनेक दिग्गज नेते पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. हळूहळू पक्षातील नेते दुरावत जात आहेत. अनेकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्ष त्यामुळे कमकुवत झाला आहे. प्रभावी नेतृत्वामुळे पक्ष सध्या दिशाहिन झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपला याचा थेट फायदा अनेक राज्यात होत आहे.कॉंग्रेसचे पारंपारिक मतदार नव्याने उदयाला आलेल्या पक्षाकडे वळत असल्याचे भाजपचे फावत आहे.अनेक राज्यात सत्तेवर येवून भाजपने चांगले काम केले आहे. अशात सत्ताधाऱ्यांची वाटचाल कॉंग्रेसमुक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे चित्र उभं झाले असल्याचे पाटील म्हणाले. कॉंग्रेसमधील नेतृत्व अभाव, राजकीय स्पष्टता, जमिनीवरील पकड सैल झाल्याने २०२४ मध्ये भाजप पुन्हा केंद्रात सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कॉंग्रेसला त्यामुळे पक्षांतर्गत सुधारणा आणि पुर्ननिर्माणाची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले.

 


Back to top button
Don`t copy text!