दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । सातारा । इंधनदरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने आज सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी मोदी तेरा कैसा खेल.. सस्ता दारू.. महंगा तेल, केंद्र सरकार हाय हाय अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
पेट्रोल डिझेल, स्वयंपाकाच्या गॅस यांची दरवाढ, तसेच वाढत्या महागाईने सामान्य जनता हैराण झाली आहे. त्याचे जगणे मुश्किल झाले आहे. याला केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असून केंद्र सरकारच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली सायकली रॅली काढण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष अॅड. विजयराव कणसे, प्रदेश प्रतिनिधी अजित पाटील चिखलीकर, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, महिलाध्यक्षा धनश्रीताई महाडिक, अनु. जाती जमातीचे अध्यक्ष मनोजकुमार तपासे उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाल, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, प्रतापसिह देशमुख, बाबुराव शिंदे, हेमंत जाधव, सुषमा राजे घोरपडे, आदी या रॅलीत सहभागी झाले होते.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने आजी पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकली रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकार हाय हाय, पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेच पाहिजेत. मोदी तेरा कैसा खेल, सस्ता दारू.. महंगा तेल.. अशा घोषणा देऊन केंद्र केंद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी डॉ. सुरेशराव जाधव म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, घरगूती गॅस दरवाढही रोजची आहे, केंद्र सरकारला सामान्य माणसाचे काही देणे-घेणे नाही, ते फक्त भांडवलीदार आणि उद्योगपती यांचे सरकार आहे. या सरकारच्या कारभाराने संपूर्ण राज्यातील जनता हैराण झाली आहे. मोदी सरकारने केलेल्या महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक राहणार आहे व सरकारला विचार करायला भाग पाडू.
या रॅलीमध्ये धैर्यशील सुपले, नाना लोखंडे, प्रकाश फरांदे, माधुरीताई जाधव, माळीण परळकर, रवी भिलारे, प्रमोद अनपट, संदीप माने, यशवंत चव्हाण, तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.