दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२२ । मुंबई । प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या 42 अग्निशमन सेवा पदकांपैकी महाराष्ट्राला सात पदकं मिळाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अग्निशमन पदक विजेत्यांचे तसेच राज्यातील सर्व अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्याबद्दल अभिनंदन केले आहे. सर्वोत्कृष्ट अग्निशमन सेवेसाठीचे ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ अग्निशमन रक्षक बाळु देशमुख यांना मरणोत्तर आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना जाहीर झाल्याबद्दल, उपमुख्यमंत्र्यांनी श्री. प्रशांत रणपिसे यांचे तसेच बाळु देशमुख यांच्या कुटुंबियांचे विशेष अभिनंदन केले आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील, संजय महामूनकर, अग्निशमक चंद्रकांत आनंददास यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.