फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकार्‍यांचे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीकडून अभिनंदन


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२३ । फलटण । फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या कारकीर्दीला साजेसे काम नूतन पदाधिकार्‍यांकडून घडावे अशा सदीच्छा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करताना व्यक्त केल्या.

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष सुभाषराव सोनवलकर, उपाध्यक्ष सचिनराजे निंबाळकर, सचिव अशोक सस्ते, खजिनदार संजय जामदार यांचे अभिंनदन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने करण्यात आले. त्यावेळी बेडकिहाळ बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त अमर शेंडे, साप्ताहिक लोकजागरचे संपादक रोहित वाकडे उपस्थित होते.

दरम्यान, या छोटेखानी कार्यक्रमात फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकार्‍यांचे शाल, गुलाबपुष्प व रविंद्र बेडकिहाळ लिखीत ‘आठवणीतले पतंगराव’ हे पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!