‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याबद्दल क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडून महाराष्ट्राच्या एनसीसी चमूचे अभिनंदन


दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । मुंबई । प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आल्याबद्दल क्रीडामंत्री सुनील केदार यांनी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्र छात्रसेनेच्या चमूला हा ध्वज प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संचालनालय आणि कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली आहे. पृथ्वी हिचेही श्री. केदार यांनी कौतुक केले आहे.


Back to top button
Don`t copy text!