राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन! ‘शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्या बद्दल मानले आभार’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.२८: कृषी विधेयकांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मध्ये फूट पडली आहे. शिरोमणी अकाली दल एनडीएतून वेगळे झाले आहे. 9 दिवसांपूर्वीच हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अकाली दलाचे अभिनंदन केले आहे.

शरद पवारांनी ट्विट करत अकाली दलाचे अभिनंदन केले आहे. ‘कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडण्याचा आपण निर्णय घेतला त्यासाठी तुमचे अभिनंदन. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल आभार, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. त्यात अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल, पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, खासदार हरसीमरत कौर बादल यांचा नावाचा उल्लेख केला आहे.

एनडीएकमधून दहा महिन्यांपूर्वी शिवसेनेने भाजपची साथ सोडत केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता अकाली दलही एनडीएमधून बाहेर पडले आहे. कृषी विधेयकांचा निषेध आणि विरोध करत हरसीमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. शनिवारी पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आहे मात्र भाजपची चिंता वाढवणारा आहे.

या 3 विधेयकांचा विरोध

फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स (प्रमोशन अँड फेसिलिटेशन) बिल

फार्मर्स (एम्पावरमेंट अँड प्रोटेक्शन) एग्रीमेंट ऑफ प्राइस एश्योरेंस अँड फार्म सर्विसेज बिल

एसेंशियल कमोडिटीज (अमेंडमेंट) बिल

1998 पासून अकाली दल एनडीएमध्ये होता

1998 मध्ये जेव्हा लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींनी एनडीएची स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जॉर्ज फर्नांडीजची समता पार्टी, जयललिताची अन्नाद्रमुक, प्रकाश सिंह बादल यांची अकाली दल आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला. समता पार्टीनंतर नाव बदलून जदयू झाली. जदयू आणि अन्नाद्रमुक एनडीएतून बाहेर होऊन परत वापस आले. शिवसेना आता काँग्रेससोबत आहे. फक्त अकाली दल हा एकमेव पक्ष एनडीएसोबत 22 वर्षांपासून होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!