लक्ष्मण सोनवलकर, बापूराव शिंदे व अमित रणवरे यांच्या निवडीबद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडून अभिनंदन


दैनिक स्थैर्य । 5 मे 2025। फलटण । भारतीय जनता पार्टीच्या नुतन तालुकाध्यक्ष लक्ष्मण सोनवलकर, बापूराव शिंदे व अमित रणवरे यांचे अभिनंदन महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

बावनकुळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पक्षाचे मंडल अध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष या नात्याने पाया बळकट करणे, बूथ सक्षमीकरण, कार्यकर्ता संवाद आणि जनसंपर्कातून समर्थन या त्रिसूत्रीवर आपल्याला येत्या काळात काम करायचे आहे. भाजपाचा सदस्य म्हणून आपण जोडून घेतलेली प्रत्येक व्यक्ती पक्षासाठी महत्वाची असणार आहे. त्याचबरोबर भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपल्याला जनमानसात घेऊन जायचे आहे. समाजाच्या तळागाळापर्यंत, सर्व घटकांना या प्रगतीचे भागीदार बनविण्याचा आपला उद्देश आहे. येत्या काळात आपण संघटना बळकट करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूत व्हावे.

या निवडीबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच तालुक्यातील भाजप पदाधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!