१५ ऑक्टोंबरला जयसिंगपूर येथे उस परिषद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । फलटण ।  विक्रमसिंह क्रीडांगण जयसिंगपूर येथे शनिवार दि. 15 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता 21 वी उस परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिली. ही परिषद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

या परिषदेत गेली कित्येक वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्फत शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे दाम मिळवून दिली आहे. एक रकमी एफ आर पी जर कुणी मिळवून देण्याचे पहिलं काम केले असेल ते म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी साहेब यांनी केली आहे. शेतकर्‍यांना आपल्या हक्काचे दाम मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने शिवाय पर्याय उरला नाही. आज कुठलाच राजकीय पक्ष शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. शेतकरी आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मेटाकुटीला आले आहे आज अशी परिस्थिती आहे की शेतकरी जगला तरच देश जगेल पण हे कोणाच्या लक्षात येईना सरकार कोणाचेही जरी आलं तरी शेतकरी प्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही फक्त आश्वासने दिली जातात ती आमलात आणली जात नाहीत. या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

सर्व शेतकरी बांधवांनी या मेळाव्यासाठी पक्षीय दृष्टीकोन बाजूला ठेवून शेतकरी हाच पक्ष म्हणून सर्वांनी 21 वी ऊस परिषदेला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर सातारा व फलटण,तालुका अध्यक्ष नितीन यादव यांनी केली आहे.

या मेळाव्यात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात येणार आहेत, एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे. वजनातील काटा मारी थांबलीच पाहिजे.साखरवाडी दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचे सतरा अठरा सालचे राहिलेली शेतकर्‍यांचे ऊस बिल त्वरित मिळाले पाहिजे. द्राक्ष बेदाणा, डाळिंब शेतकरी हिताचा पिक विमा योजना लागू करावी, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन पर 50000 हजार अनुदान शेतकर्‍यांना तातडीने द्यावी, शेतकर्‍यांना दिवसा बारा तास लाईट द्यावी, शेतकर्‍यांच्या पिकाला हमीभाव द्यावा या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांनी जयसिंगपूर येथील उस परिषदेस लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय माहुलकर फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!