दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । आंतरराष्ट्रीय व ऑलिंम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शस्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवणे आवश्यक आहे. या करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील 10 ते 14 या वयोगटातील फक्त मुलांकरिता ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग, आर्चरी तसेच 8 ते 12 वयोगटातील मुलांकरिता डायव्हिंग व 13 ते 14 वयोगटाकरिता ट्रायथलॉन या खेळाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन दि. 5 ते 6 ऑक्टोबर 2021 या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सकाळी 8.30 वा केले आहे. सर्व खेळाडूंनी दि. 5 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8.30 वा. उपस्थित रहावे. त्याचप्रमाणी खेळाडूचे दिनांक 1.1.2022 रोजी वय 8 ते 14 वर्षे असणे आवश्यक आहे.
तरी इच्छुक खेळाडूंनी आधारकार्ड, जन्म दाखल्याचा पुरावा (बोनाफाईट सत्यप्रत) व कोविड-19 आर.टी.पी.सी.आर. चाचणी केल्याबाबतचा पुरावा (किमान 1 दिवस अगोदर) इ. कागदपत्रांसह उपरोक्त कालावधीत उपिस्थत राहावे असे आवाहन युवराज नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री सुहास व्हनमाने तालुका क्रीडा अधिकारी -7875326326, श्री. अनिल सातव क्रीडा मार्गदर्शक-9623945371, श्री .महेश खुटाळे क्रीडा मार्गदर्शक-9422603411 व दत्ता माने क्रीडा मार्गदर्शक -8888851622 या क्रमांकावर संपर्क साधावा.