दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, फलटण आणि प.पू. उपळेकर महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, अधिक मासाचे औचित्य साधून श्री विष्णूयागाचे आयोजन केले होते. यावेळी फलटणमधील अनेक नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
पहाटे पवमान अभिषेक करून शुभारंभ झाला. सर्व धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न होऊन पूर्णाहुतीनंतर आरती व महाप्रसाद झाला. यावेळी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर ताईसाहेब आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. भाऊसाहेब कापसे, तुषारभैया नाईक निंबाळकर, दत्तात्रय गुंजवटे, महादेवराव माने आणि ट्रस्टचे पदाधिकारी यांचीही विशेष उपस्थिती होती. श्री. सुभाषमामा कुलकर्णी, श्री. गणेश लाटकर, निरंजन क्षीरसागर गुरूजी व सर्व ब्रह्मवृंदांनी गणेश यागाचे पौरोहित्य केले.