30 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यामध्ये लाळ-खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.१६: पशुसंवर्धन विभागाअंतर्गत प्राण्यांमधील संक्रामन व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत जिल्ह्यामध्ये लाळ-खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनास लसीकरण करुन घेणे सक्तीचे व बंधनकारक राहील. तसेच जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवडी बाजारात खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या पशुपालकांचे जनावनरांना टॅगीग व लाळ-खुरकत रोगाचे लसीकरण बंधनकारक असुन त्याशिवाय कोणतीही खरेदी विक्री करता येणार नाही. शेतकऱ्यांनी व्यापक हिताच्या दृष्टीने पशुधनास टॅगींग करुन लसीकरण करुन घ्यावे यासाठी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम, शेखर सिंह यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!