रॅगिंग विरोधी कायदा आणि वाहतुकीचे नियमाविषयी विधी जागरुकता शिबीराचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्हा न्यायाधीश श्रीमती  मंगला धोटे, अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आयोजित रामशास्त्री  सभागृह, जिल्हा न्यायालय, सातारा आणि छ.शिवाजी कॉलेज, सातारा येथे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारण यांची अंमली पदार्थांमुळे पीडीत व्यक्तींना विधी सेवा आणि अंमली पदार्थांचे निर्मुलन योजना 2015, अॅसिड हल्ल्याच्या पिडीताना विधी सेवा योजना 2016 आणि रॅगिंग विरोधी कायदा आणि वाहतुकीचे नियमाविषयी विधी जागरुकता शिबीर घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्री. संदिप भुजबळ यांनी केले. त्यानंतर  दत्तात्रय गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी वाहतुकीचे नियम या विषयी सविस्तर माहिती दिली. या  नियमांचे उल्लंघन झाल्यास काय परिस्थिती निर्माण होते हे दाखविणेसाठी त्यांनी विविध पीपीटी व शॉर्ट व्हीडीओ सादरीकरण केले.  त्यानंतर अँड मनिषा बर्गे, समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांनी रॅगिंग विरोधी कायद्या विषयीचे मार्गदर्शन केले. रॅगींगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उध्वस्त झाले असल्याची उदाहरणे त्यांनी दिली. तसेच या घटनामुळे किती शिक्षा होते व त्यामुळे आयुष्याचे नुकसान होवू शकते.

एस.डी. सावरकर, मुख्य न्यायाधीश, बाल न्याय मंडळ, सातारा यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारण यांची अंमली पदार्थांमुळे पीडीत व्यक्तींना विधी सेवा आणि अंमली पदार्थांचे निर्मुलन योजना 2015, अॅसिड हल्ल्याच्या पिडीताना विधी सेवा योजना 2016 या योजनांची खुलासेवार माहिती दिली.. तसेच वरील दोन्ही योजनामधील पिडीतांना काय सुविधा प्राधिकरणामार्फत मिळू शकतात याची माहिती दिली.

. या कार्यक्रमास कॉलेजमधील सुमारे 156 विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. दिलीप भोसले, लघुलेखक यांनी मानले. सहाय्य व सल्ला मिळणेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!