दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने लैंगिक काम करणाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी कार्यशाळा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेस बाल न्याय मुडळाचे मुख्य न्यायाधीश एस.डी. सावरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले, ॲड, मनिषा बर्गे आदी उपस्थित होते.
श्री. सावरकर यांनी न्यायालयामार्फत लैंगिक काम करणऱ्यांच्याबाबतीत कशा प्रकारे प्रक्रिया राबविली जाते. याची सविस्तर माहिती देवून उपस्थित केलेल्या शंकाचे निरसण केले.
कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.