दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । मान्सून पूर्व तयारीचा भाग म्हणून पाटण तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकारी ,पोलीस पाटील,कोतवाल , ग्रामसेवक यांचे संभाव्य भुस्खलन होण्यापूर्वी व भुस्खलन झाल्यानंतर काय दक्षता घ्यायची या बाबत संयुक्त प्रशिक्षण प्रांताधिकारी सुनील गाढे यांचे उपस्थितीत सुस्वाद मंगल कार्यालयात घेण्यात आले .
या प्रसंगी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील सेवानिवृत्त भूगर्भशास्त्र विषयातील तज्ञ प्राध्यापक डॉ. सतीश थिगळे यांनी सविस्तर दृक्श्राव्य माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले . तसेच या दरम्यान मिरगाव येथील पोलीस पाटील यांनी मागील वर्षी मिरगाव येथे झालेल्या भुस्खलन बाबतचा अनुभव कथन केला.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेक लावंड, नायब तहसीलदार तुषार बोरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.