
दैनिक स्थैर्य । 27 एप्रिल 2025। फलटण । तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडी वस्तीवर गाव बस्ती अभियान राबवा, असे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार फलटण तालुक्यात गाव बस्ती संपर्क अभियानाची सुरुवात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, वाठार स्टेशन मंडल अध्यक्ष अमित रणवरे, कोळकी मंडल अध्यक्ष लक्ष्मण सोनवलकर, फलटण मंडल अध्यक्ष बापुराव शिंदे, माजी अध्यक्ष बजरंग गावडे, जिल्हा उपाध्यक्ष संदिप चोरमले, सरचिटणीस संतोष सावंत, माजी नगरसेवक सुधीर अहिवळे, अजय माळवे, युवा मोर्चाचे अध्यक्ष संतोष गावडे, माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणजितसिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र व राज्य शासनाच्या राबविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच या अभियानात प्रत्येक बुथ अध्यक्ष व प्रमुख नेते, कार्यकत्यार्र्नी प्रत्येक गावात जाऊन मंदिरे स्वच्छ करावीत. गावातील शाळा, दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालय यांना भेेटी द्याव्या. गावातील लाभार्थ्यांची भेट घेऊन संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी अभियानाची माहिती दिली. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व मंडल अध्यक्ष व पदाधिकार्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. युवा मोर्चाचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी आभार मानले.