मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून आमदार चंद्रकांत पाटील कुटुंबियांचे सांत्वन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । कोल्हापूर । माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री.पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, भगवानराव साळुंखे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. पाटील यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला.


Back to top button
Don`t copy text!