दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२३ । म्हसळा । सम्यक कोकण कला संस्था, महाराष्ट्र (रजि.) या संस्थेचे माननीय कार्याध्यक्ष, रिपब्लिकन सेना दक्षिण मुंबईचे अध्यक्ष, बौद्धजन पंचायत समिती, शिवडी गट क्र.१३ चे सल्लागार, कलावंताचे आधारस्तंभ आदरणीय भगवान परशुराम साळवी यांच्या मातोश्री शालिनी परशुराम साळवी मौजे फळसप, ता. म्हसळा, जिल्हा रायगड यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले.
कालकथित शालिनी साळवी या कष्टाळू, कणवाळू, प्रेमळ व हळव्या मनाच्या होत्या त्यांचे पती मुले लहान असतानाच त्यांना सोडून गेल्यानंतर त्यांनी सर्व मुलांना मोठया कष्टाने आदर्श नागरिक घडवून समाजार्पण केलं.
कालकथित शालिनी साळवी यांच्या अंतयात्रेतला सर्वच पक्षातील, स्तरातील लोक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, त्यांच्यापाठी कृष्णा धोंडू साळवी, वनिता कृष्णा साळवी, बाळाराम काशीनाथ साळवी, त्यांचे जेष्ठ सुपुत्र सुभाष साळवी, शुभांगी साळवी, भगवान साळवी, स्वाती साळवी, किशोर साळवी, ज्योती साळवी, सुधीर साळवी, ज्योत्स्ना साळवी, मुलगी आयुष्यमती शांता दीपक तांबे, आयुष्यमती दीपाली सुरेश खैरे तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे, शालिनी साळवी यांच्या वृद्धपकाळात त्यांची मूल व सुना यांनी अगदी लहान मुलांसारखा त्यांचा सांभाळ करून त्यांची भरपूर सेवा केली.
कालकथित शालिनी साळवी यांचा पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम रविवार ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता बौद्धजन सेवा संघ, फळसप चे अध्यक्ष के.जी.साळवी यांच्या अध्यक्षतेखाली मौजे फळसप येथे करण्याचे योजिले आहे. सदर शोकसभेस बौद्धजन पंचायत समितीचे सभापती मा. आनंदराज आंबेडकर, उपसभापती विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, सरचिटणीस राजेशजी घाडगे, फळसप गाव देवस्थानचे कार्यसम्राट भास्करराव जाधव-विचारे (दाजी) चेअरमन विजय बापू विचारे, कार्याध्यक्ष अशोक विचारे (अप्पा), विश्वस्त सरपंच सुधीर साळवी, भार्गवदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली सम्यक कोकण कला संस्थेचे कलावंत आणि विविध संघटनांचे मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कालकथित शालिनी साळवी यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत तरी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मोठ्या संख्येने सदर शोकसभेस उपस्थित राहुन शालिनी साळवी यांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन कार्यकर्ते सिद्धार्थ साळवी यांनी बौद्धजन सेवा संघाच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात केले आहे.