स्थैर्य, सातारा दि.१९: सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या कोविड-19 रुग्णांचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यास अधिन राहुन शेखर सिंह, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी , सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील “काळी पिवळी टॅक्सी” व्यवसाय सुरु करण्यास खालील सूचना व मार्गदर्शक सूचनेस अधिन राहून मान्यता दिली आहे.
काळी पिवळी टॅक्सी व्यावसायिक यांनी बुकिंग ऑफिस येथे प्रत्येक पर्यटकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासणी करणे आवश्यक आहे. ज्या पर्यटकांचे 38.0 अंश किंवा 100.4 पेक्षा जास्त आहे अशा पर्यटकांना काळी पिवळी टॅक्सी मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. ज्या पर्यटकांना फ्लू सदृश्य लक्षणे उदा. सर्दी, खोकला इ. लक्षणे असल्यास प्रवासासाठी प्रतिबंध करण्यात यावा व संबंधित पर्यटकास दवाखान्यामध्ये संदर्भित करण्यात यावे. पर्यटकांची नोंद रजिस्टरमध्ये ठेवणे बंधनकारक आहे. एका टॅक्सीमध्ये एका वेळी एकाच कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. एका टॅक्सीमध्ये एका वेळी 3 + 1 पेक्षा जास्त प्रवासी संख्या असू नये. टॅक्सीचालक यांचे बाजूला पर्यटकांना बसण्यास प्रतिबंधन करावा. टॅक्सीचालक व प्रावासी यांच्यामध्ये पार्टीशन असणे आवश्यक आहे. टॅक्सीचालक यांनी टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक फेरीवेळी निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे. वेळोवेळी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे.
या आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल.