महाबळेश्वर व पाचगणी येथे घोडेस्वारी व नौका विहारासाठी सशर्त परवानगी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.१९: सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या कोविड-19 रुग्णांचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यास अधिन राहुन शेखर सिंह, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी , सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणी येथील “घोडेस्वारी” तसेच महाबळेश्वर येथील “वेण्णा लेक बोट क्लब येथे नौका विहार” पर्यटनाच्या बाबीसाठी खुले करण्यास तसेच व्यवसाय सुरु करण्यास खालील सूचना व मार्गदर्शक सूनचेस अधिन राहुन मान्यता देत आहे. 

घोडेस्वारी : नगरपालिकेने घोडेस्वारांना 1 दिवसाआड 50 टक्के घोडस्वारांचे नियोजन करुन देणे बंधनकार राहिल. दररोज प्रत्येक पर्यटकांची नोंद नोंदवहीत ठेवणे घोडेस्वारांवर बंधनकारक राहिल. जी पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली नाहीत अशा ठिकाणी घोडेस्वारी करण्यास मनाई राहील. घोडेस्वारीसाठी वारपण्यात येणाऱ्या घोड्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी घोडे चालक अथवा मालक यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. घोडेस्वारीसाठी नागरपरिषद परवाना व बॅचक्रमांकं असणे आवश्यक आहे. देण्यात येणरा बॅचक्रमांक दर्शनी भागामध्ये लावणे बंधनकारआहे. संघटनेमार्फत घोड्यांना क्रमांक देण्यात व दिलेल्या क्रमांकानुसाराच (Queue System) घोडेस्वारी करणे बंधनकारक आहे. कोणत्या ही प्रकारची गर्दी होणर नाही याची खबरदारी घेण्यात यावी. ज्या पर्यटकांचे तापमान 38.0 किंवा 100.4 पेक्षा जास्त आहे व ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असल्यास अशा पर्यटकांना घोडेस्वारी करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा. तापमान जास्त अथवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्तीस रुग्णालयामध्ये संदर्भित करावे. ज्या पर्यटकांना कोविड-19 सदृश्य लक्षणे उदा. सर्दी, खोकला इ. लक्षणे असल्यास घोडेस्वारीसाठी प्रतिबंध करण्यात यावा व दवाखान्यामध्ये संदर्भित करावे. संघटनेने येणाऱ्या पर्यटकांचे नांव, पत्ता, वय, Co morbidity, तापमान, SpO2 व मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात यावी. घोडे चालक व मालक यांची प्रत्येक 15 दिवसांनी कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे व चाचणी केलेबाबतचा अहवाल नगरपरिषद कार्यालयामध्ये सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता परवाना रद्द करण्यात येईल. घोडेस्वारी करतांना घोडेव्यावसायिक यांनी मास्क, ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करावा. पर्यटकांना देखील मास्क ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक आहे. घोडेस्वारीच्या दरम्यान मानवी संपर्क होत असलेल्या वस्तू निर्जंतूक करण्यात याव्या. ज्या ठिकाणी घोडे स्वारीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी घोडेस्वारी करण्यात यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रस्त्यावर घोडेस्वारीच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी घोड्यांची विष्टा पसरणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. वेळोवेळी शासनमार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे. 

वेण्णा लेक बोट कल्ब येथे नौका विहार : नगरपालिकेने दर दिवाशी एका बोटीच्या फक्त दोन फेऱ्या होतील एवढ्याच फेऱ्यांचे नियोजन करावे. बोटिंग क्लबच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे, बोटी सॅनिटाईज करणे,पर्यटकांना सुरक्षिततेच्या सुचना देणे, मास्क व सॅनिझाटयझरचा वापर इ. सर्व नियोजन करण्याची जबाबदारी नगरपालिकेची राहील. बोटिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना सामाजिक अंतर राखणेबाबत सूचित करण्यात यावे व रांग पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. बुकिंग ऑफिसच्या ठिकाणी सामाजिक अंत राखण्यासाठी 1 मीटर अंतरावर खुणा करुन घेणे. ऑनलाईन बुकिंग करीता प्राधान्य देण्यात यावे. बुकिंग ऑफिस येथे पर्यटकांना ई-पेमेंट सुविधा देण्यात यावी. बोटिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रवेशद्वाराजवळ सामाजिक अंतर राखून तपासणी करण्यात यावी. यामध्ये पर्यटकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात यावी. बोटिंगसाठी यणाऱ्या पर्यटकांचे नाव, पत्ता,वय, Co morbidity, तापमान, SpO2 व मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात यावी. ज्या पर्यटकांचे तापमान 38.0 किंवा 100.4 पेक्षा जास्त आहे व ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असल्यास अशा पर्यटकांना घोडेस्वारी करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा. तापमान जास्त अथवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्तीस रुग्णालयामध्ये संदर्भित करावे. ज्या पर्यटकांना कोविड-19 सदृश्य लक्षणे उदा. सर्दी, खोकला इ. लक्षणे असल्यास घोडेस्वारीसाठी प्रतिबंध करण्यात यावा व दवाखान्यामध्ये संदर्भित करावे. तिकीट विक्रीच्या ठिकाणी असलेल्या कर्मचारी यांनी मास्क, ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. बोटमन यांनी मास्क, फेस शिल्ड, ग्लोब्ज, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. पर्यटक यांनी मास्क, फेस शिल्ड, ग्लोब्ज, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. तिकीट मिळाल्यानंतर सामाजिक अंतर पाळून बोट पर्यटकांना देण्यात यावी. जेट्टीवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. एका बोटीमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. एका बोटीमध्ये जास्तीत जास्त 6 पर्यटक व 1 चालक यापेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये. नौका विहाराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. सहली अथवा मोठया समूहांना (ग्रुप) बोटिंगसाठी परवानगी देण्यात येऊ नये. प्रत्येक फेरीच्या वेळी बोट निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. वेळोवेळी शासनमार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे. 

या आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!