दाबोळी विमानतळावरील कोरोना निगेटिव्हची अट मागे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दाबोळी, दि. २: आता देशी विमानातून गोव्यात येणार्‍या प्रवाशांना आपण कोरोना निगेटिव्ह
असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन येण्याची आवश्यकता नाही. दाबोळी
विमानतळावर प्रवाशांकडून अशा कोरोना निगेटिव्ह वैद्यकीय प्रमाणपत्राची
मागणी करण्यात येणार नसल्याचे काल दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी स्पष्ट
केले.

केंद्र सरकारच्या अनलॉक-४ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशी विमानातून
गोव्यात येणार्‍या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह वैद्यकीय प्रमाणपत्र
आणण्याची गरज नाही. त्यामुळे विमानतळावर अशा वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी
केली जाणार नसल्याचे काल विमानतळ सूत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहव्यवहार
मंत्रालयाने अनलॉक-४ च्या मार्गदर्शक सूचनांतर्गत लोकांवर घातलेले कित्येक
निर्बंध मागे घेतले आहेत. त्यात कोरोना निगेटिव्ह वैद्यकीय प्रमाणपत्राचाही
समावेश आहे. त्याशिवाय राज्याच्या सीमांवरील चाचणीची अटही मागे घेण्यात
आलेली आहे.

गोवा एअरपोर्टने मंगळवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आंतरराज्य
प्रवासातील सर्व निर्बंध भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मागे
घेण्यात आले आहेत. देशी विमानांतून येणार्‍या प्रवाशांना यापुढे आपण कोविड
निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणावे लागणार नाही. तसेच त्यांना
विमानतळावर कोरोनासाठीची चाचणीही करून घ्यावी लागणार नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!