राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचा समारोप


दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२२ । नागपूर । राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने 49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे विधानभवन नागपूर येथे 20 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले. या संसदीय अभ्यासवर्गाचा आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनील झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते यांच्या उपस्थितीत समारोप झाला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अभ्यासवर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या प्रा.डॉ.विद्या चौरपगार यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेने या अभ्यासवर्गाचे आयोजन केल्‍याबद्दल आभार व्यक्त केले. अवर सचिव सुनील झोरे यांनी अभ्यासवर्ग यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.


Back to top button
Don`t copy text!