
दैनिक स्थैर्य । दि. १३ जानेवारी २०२३ । सातारा । जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे “सातारा जिल्हा कारागृह” येथील बंदिवानांसाठी साठी “दोन महिने कालावधीचा मोफत कॉम्प्युटर अकाउंटिंग विथ ऑफीस असिस्टंट” हा प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे दुसरा प्रशिक्षण कार्यक्रम “मोटार रिवाइंडिंग हा एक महिना कालावधीसाठी” मोफत सातारा जिल्हा येथील कारागृह येथील बंदिवानांसाठी सुरू झाला आहे.
हे प्रशिक्षण घेऊन कारागृहातील तरुण बंदी प्रशिक्षीत होऊन कारागृहातून सुटल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहावेत व स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा या उद्देशाने कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी सहकार्य केले आहे.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, महाराष्ट्र उद्योजक्ता विकास केंद्र एम.सी.डी. सातारा प्रकल्प अधिकारी शितल पाटील, संगणक प्रशिक्षक नितीन गायकवाड, मोटर वायंडींगचे प्रशिक्षक अर्जुन जाधव, प्रगती महिला कल्याणकारी शैक्षणिक संस्था अध्यक्ष अलका पाटील उपस्थित होते.