
कारणे नको, रिझर्ल्ट दाखवा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना व यंत्रणेला ना.शंभूराज देसाईंच्या बैठकीत सुचना
स्थैर्य, दौलतनगर दि.०७ : कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते संगमनगर धक्का हा ४८ किलोमीटरचा भाग पाटण मतदारसंघात येतो ४८ किलोमीटरपैकी केवळ २८ किलोमीटरचे काम पुर्ण झाले हे २० किमी अंतरातील रस्त्याचे काम होणे अद्यापही बाकी आहे. उर्वरीत राहिलेले संपुर्ण काम डिसेंबर २०२० अखेर पुर्ण करा. डिसेंबर नंतर कोणतीही मुदतवाढ संबधित यंत्रणेला देवू देणार नाही. मला कारणे नकोत रिझर्ल्ट दाखवा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.
आज पाटण तहसिल कार्यालयातील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहामध्ये गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते संगमनगर धक्का रस्त्याच्या अपुऱ्या कामां संदर्भात आढावा बैठक झाली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या. या बैठकीस राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता प्र. शां. औटी, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समिर यादव, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. सागांवकर, उपअभियंता श्रीमती पी. जी. बारटक्के, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पाटण नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अभिषेख परदेशी, एल अँड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रविंद्र भोईटे, एल अँड टी कंपनीचे सहाय्यक विनायक कोरे, टी. आर. देवरे, सार्व. बांध विभागाचे उपअभियंता अजित पाटील, पाटणच्या सपोनि तृप्ती सोनावणे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक महेश पाटील यांच्यासह एल.ॲन्ड टी कंपनीचे सर्व प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना ना. शंभूराज देसाई म्हणाले, कराड चिपळूण रस्त्याच्या अपुऱ्या कामांसंदर्भात मागे दोनदा बैठका झाल्या आहेत. पाटण मतदारसंघातील कराड ते संगमनगर धक्का या लांबीमधील रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाने पुर्ण करुन दिली आहे. काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत ती पोलीस बंदोबस्तात काढणेसंदर्भात मागील बैठकीतच सुचना केल्या आहेत. अतिक्रमण धारकांना संबधित यंत्रणेकडून अनेकदा नोटिसा देवून झाल्या आहेत. कुणी अडथळा करीत असेल तर एल.ॲन्ड टी कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांने उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मदतीने तात्काळ ती अतिक्रमणे करणाऱ्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. सार्वजनीक बांधकाम विभागाने रस्ता हस्तातंर करताना रस्त्याची रुंदी याचे सविस्तर नकाशे राष्ट्रीय महामार्गाचे तसेच एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिक्रमणे काढून कामाला गती देण्याचे काम आता राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व एल.ॲन्ड टी कंपनीची आहे. कराड ते पाटण या भागातील सुमारे ०६ किमी लांबीचे रस्त्याचे काम अद्यापही बाकी आहे. १५ ऑगस्टनंतर हे काम सुरु करुन सप्टेंबर २०२० पर्यंत हे काम पुर्ण करण्याचे नियोजन संबधित यंत्रणेने करावे. मल्हारपेठ असो वा नवारस्ता या मोठया बाजारपेठामध्ये अतिक्रमण धारकांनी स्वत:हून आपआपली अतिक्रमणे काढून घेतली आहेत मल्हारपेठ, नवारस्ता या मुख्य बाजारपेठांना जो नियम लावला आहे तोच नियम या मार्गावरील सर्व प्रमुख ठिकाणी लावावा. जिथे जिथे कंपनीला अडथळा निर्माण होत आहे त्या त्या ठिकाणी तालुका प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना तसेच एल.ॲन्ड टी कंपनीस वेळोवेळी सहकार्यच केले आहे त्यामुळे आता सर्वस्वी जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्गाची व एल.ॲन्ड टी कंपनीची आहे पाच महिन्यांचा कालावधी कंपनीला दिला आहे या पाच महिन्यांच्या कालावधीत उर्वरीत राहिलेला संपुर्ण रस्ता पुर्ण करुन दयावा डिसेंबर २०२० नंतर कंपनीचे कोणतेही म्हणणे एैकून घेतले जाणार नाही. त्यामुळे रिझर्ल्ट दाखवा असे शेवटी ना. शंभूराज देसाईंनी बैठकीत उपस्थितांना सांगितले.
अधिक्षक अभियंत्यांनी कंपनीला बार चार्ट करुन दया.आजच्या बैठकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिक्षक अभियंत्यांनी एल.ॲन्ड टी कंपनीस उर्वरीत राहिलेल्या कामांचा बार चार्ट आजच करुन दयावा व बार चार्टप्रमाणे कंपनीकडून रस्त्याचे काम सुरु आहे का? याच्यावर नियत्रंण कार्यकारी अभियत्यांनी ठेवावे असे सांगून ना. शंभूराज देसाईंनी उर्वरीत कामाचा केलेला बारचार्ट मला दोन दिवसात दाखवून घ्यावा अशाही सुचना यावेळी केल्या.