फ्लॅटधारकांनी दिला आंदोलनाचा इशारा
स्थैर्य, सातारा दि 10 : 486 मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या आर्य वृंदावन सोसायटीच्या 56 फ्लॅटधारकांनी बिल्डरच्या विरोधात नाहक होणाऱ्या त्रासाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली त्या प्रकरणी जर न्याय मिळाला नाही तर फलॅटधारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे .
जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की आर्या डेव्हलपर्सचे विकसक दिग्विजय गायकवाड यांनी बांधलेल्या आर्या वृंदावन सोसायटीत 56 सदनिकाधारक आहेत . गायकवाड यांनी या प्रकल्पांच्या उभारणीत फ्लॅटधारकांकडून लाखो रुपये उकळून कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत . खरेदी पत्र पूर्तता न करणे, कॉमन टेरेस वापरू न देणे, कॉमन पार्किंगमध्ये उभे राहण्यास मज्जाव करणे इ प्रकारचा त्रास बिल्डर गायकवाड त्याची पत्नी व कर्मचारी मुफीज कापशीकर याच्याकडून दिला जात आहे .पाशिवाय पिण्याच्या पाण्याच्या लाईन सुद्धा योग्य पध्दतीने दिली नसल्याची तक्रार आहे . पिण्याचे पाणी अशुद्ध करणे, इमारतीच्या पार्किगमध्ये संबंध नसणाऱ्या व्यक्तींना पाठवणे, नळ कनेक्शन तोडणे ङ स्वरूपाचा त्रास बिल्डर गायकवाड यांच्याकडून दिला जात असून सदनिका धारकांना बघून घेतो अशी दमदाटीची भाषा वापरली जात आहे . या दडपशाहीच्या विरोधात संरक्षणाची मागणी करून बिल्डरला कठोर शासन करावे असे साकडे छ्पन्न सदनिकाधारकांनी या तक्रार अर्जा द्वारे घातले आहे . या प्रकरणी न्याय न मिळाल्यास मोर्चा काढून येत्या सोमवारी दि 14 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे .