
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑगस्ट : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, फलटण तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभाग आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी सराव पेपर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मुधोजी हायस्कूल येथे होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्व नाव नोंदणी करणे अनिवार्य असून, त्याची अंतिम मुदत १४ ऑगस्ट आहे. लक्ष्मी नगर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये ५० रुपये प्रवेश शुल्क भरून नाव नोंदणी करता येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी महिला आणि पुरुष गटात स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास प्रत्येकी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास ५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय सहाव्या क्रमांकापर्यंत उत्तेजनार्थ बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.
अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी आयोजकांनी दिलेल्या ९२८४२७४९१३ आणि ८०१०२३९०६२ यासह अन्य क्रमांकांवर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

