मागील वर्षाच्या तुलनेत ९४% भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी उत्सुक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०२: प्रगत देशातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधील उत्कृष्ट शैक्षणिक सोयीसुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालये यांचे मोठ्या प्रमाणावर आकर्षण भारतीय विद्यार्थ्यांना असते. यामुळेच गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणा-या भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ९४% भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी उत्सुक असल्याचे भारतातील सर्वात मोठा स्टडी अब्रॉड प्लॅटफॉर्म लेव्हरेज एडुद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. ब्रिटन, अमेरिका आणि इतर विकसित देशांतील सरकारांचा उच्च शिक्षण आणि स्थलांतर धोरणातील खुलेपणाचा हा मोठा परिणाम असून पूर्वीपेक्षा ते अधिक चांगल्या प्रकारे स्वागत करणारा संवाद साधत आहेत.

उत्कृष्ट आरोग्य सुविधेसह प्रो-स्टुडंट धोरणे, ब्रिटन आणि भारतादरम्यान झालेला मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप करार, कॅनडाद्वारे ९०,००० अनिवासीयांना कायम रहिवासी करण्याची करण्यात आलेली घोषणा यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा हा यावर्षी परदेशी शिक्षणाकडे राहिला असल्याचे लेवरेज एडूचे संस्थापक आणि सीईओ श्री अक्षय चतुर्वेदी यांनी सांगितले.

मागील ५ महिन्यांत लेवरेज एडू प्लॅटफॉर्मवर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ७५ टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी ब्रिटनला पसंती दर्शवली आहे. त्यानंतर कॅनडा आणि अमेरिकेला अनुक्रमे १३% आणि ९% असे स्थान दिले. ५९% विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाचे स्थान बदलायचे नाही असे ठरवले. तर ब्रिटनमधील वेगवान लसीकरण तसेच जागतिक विद्यार्थ्यांच्या बाजूने असणारी एनएचएसची धोरणे यामुळे २८% विद्यार्थ्यांनी इतर देशांतून ब्रिटनला जाण्यास पसंती दर्शवली आहे.

महामारीदरम्यान विद्यापीठांनी केलेला संवाद फायद्याचा ठरला असून त्यांनी प्रदान केलेली माहिती निर्णय घेताना उपयुक्त ठरली असल्याचे ६०% विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट/बिझनेस कोर्सना शीर्ष प्राधान्य दिले असून इंजिनिअरिंगला ३५% तर बिझनेस कोर्सला १८ % प्राधान्या मिळाले. डेटा सायन्स/ अॅनलिस्टमधील अभ्यासक्रमांनाही या वर्षी ९% विद्यार्थी जातील. परदेशी शिक्षणासाठीचा खर्च हा लाखांच्या घरात असतो म्हणूनच ६०% विद्यार्थी शैक्षणिक कर्जाद्वारे शिक्षणासाठी पैसे उभारण्याचा विचार करत असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडाने मागील वर्षी अनेक प्रो-स्टुडंट धोरणे आणली आहेत. आरोग्यसुविधा सध्या केंद्रस्थानी आहे. विद्यापीठांनी अनेक सुविधांच्या पातळीवर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आधार दिला असल्याचे लेवरेज एडुचा विद्यार्थी अनमोलने सांगितले.

मी यंदा ब्रिटनला जाऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे माझे विद्यापीठ क्वारंटाइनचा खर्चही देणार आहे. मी लवकरात लवकर जाण्यासाठी आणि कँपसमध्ये शिक्षम सुरु करण्यास उत्सुक असल्याचे लेवरेज एडुचा विद्यार्थी अभिजितने सांगितले.


Back to top button
Don`t copy text!