
दैनिक स्थैर्य । 3 मे 2025। फलटण । अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) केंद्र फलटण यांच्यावतीने सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्रतबंध सोहळ्याच्या निमित्ताने स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. शंकर मार्केट येथून सायंकाळी 5 वाजता बटूंची भिक्षावळ मिरवणूक निघाली होती. या सामुदायिक व्रतबंध सोहळ्यास फलटण शहर व परिसरातील ब्राह्मण समाज उपस्थित राहिला होता.