
दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। फलटण । अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) फलटण शाखेच्या वतीने महाराजा मंगल कार्यालयात शनिवार दि. 3 रोजी सकाळी 11 वाजून 3 मिनिटांनी सामुदायिक व्रतबंधाचे (मुंजी) आयोजन करण्यात आले आहे.
उपनगरसंस्कार शुल्क पाच हजार रुपये असून त्यामध्ये बटू व बटूचे आई-वडील यांच्यासह 10 व्यक्तींच्या नाष्टा व भोजनखर्च समाविष्ट आहे. याशिवाय ब्राह्मण दक्षिणा, भिक्षावळ आदींचा खर्च समावेश आहे. 10 व्यक्तींच्या शिवाय होणार्या प्रती व्यक्तीस 200 रुपये ज्यादा शुल्क आकारण्यात येणार आहे. वेदशास्त्रसंपन्न गुरुजींकडून सर्व विधी शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात येणार आहेत.
मुंजीची नाव नोंदणीसाठी विहित नुमन्याच्या अर्ज करणे गरजेचे आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी भालचंद्र ताथवडकर मोबा. 9421881563, नंदकुमार केसकर 9665160525, वामनराव कुलकर्णी 7378683996 वैभव विष्णुप्रद 9850595957 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.