दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । सातारा । सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत कार्यरत असलेल्या वसतिगृह व निवासी शाळेमधील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद हा अभिनव उपक्रम समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 30 सप्टेंबर 2022 ते 3 ऑगस्ट 2022 या कालावधीत शासकीय वसतिगृह व निवासी शाळेस अचानक भेटी देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना मिळणारे भोजन, सोयी-सुविधा व इतर अडी-अडचणीबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सहायभूत ठरणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या शिष्यवृत्ती व इतर योजनांबाबत मार्गदर्शन केले.