टॉयलेटमध्ये सापडलेल्या मृतावस्थेतील मानवी भ्रुणांची चौकशी करण्यासाठी समिती : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


स्थैर्य, सातारा दि. 5 : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्या स्वच्छता कामगारांना ड्रेनेजची स्वच्छता करताना टॉयलेटमध्ये दोन मानवी भ्रुण मृतावस्थतेत सापडल्याची बातमी वृत्तपत्रांतून प्रसिध्द झाली आहे.  या अतिसंवेदनशनील बाबीची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चौकशी समितीची तात्काळ नियुक्ती केली असून 14 ऑगस्ट पूर्वी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या चौकशी समितीमध्ये जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, महिला व बालविकास अधिकारी  मनोज ससे, क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालयाच्या विधी अधिकारी पुनम साळुंखे यांचा समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!