
दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । वाखरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत भाजप प्रणित श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्व १३ जागा जिंकून सोसायटीवरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन मंडळ सदस्या अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी नवनिर्वाचित सदस्य व मतदार बंधू भगिनींचे गावात जाऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या तर आगामी काळामध्ये वाखरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्वसाधारण मतदार संघात ६९२ मतदान झाले, त्यापैकी २९ मते अवैध ठरली ६६३ वैध मतांपैकी खालीलप्रमाणे सर्वाधिक मते घेऊन भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात तुषार महादेव शिंदे (४४६), जनार्दन जयवंत माने (४०२), अंकुश नाथबुवा मोहिते (३९७), गोरख मारुती मोहिते (३८८), संदीप नागू ढेकळे (३८०), पंढरीनाथ बाळासाहेब जाधव (३७४), तानाजी दिनकर ढेकळे (३५६), शिवाजी सखाराम जाधव (३३६).
महिला राखीव मतदार संघात ६९२ मतदान झाले, त्यापैकी २८ मते अवैध ठरली उर्वरित ६६४ मतांपैकी ३५३ मते घेवून सुलभा दयानंद मोहिते आणि ३४६ मते घेवून जयश्री काशीनाथ गरड विजयी झाल्या आहेत.
अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघातील ६७६ वैध मतांपैकी ३८१ मते घेवून सचिन जगन्नाथ गायकवाड, वि. जा. भ. ज. विशेष मागास प्रवर्गातील ६७४ वैध मतांपैकी ४५१ मते घेवून दादा बापूराव ढेकळे, इतर मागास प्रवर्गातील ६७७ वैध मतांपैकी ३६३ मते घेवून पोपट किसन सुतार विजयी झाले आहेत.
भाजप समर्थक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अशी सरळ लढत झाली, त्यामध्ये भाजप प्रणित श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने बाजी मारुन सोसायटीवरील आपली सत्ता अबाधीत ठेवली आहे. ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व तुकाराम शिंदे यांनी केले. त्यांना सर्वांची उत्तम साथ लाभली.