ग्राहकांना गुणवत्तापूर्ण दर्जा देण्यासाठी कटिबद्ध : हनुमंत तांबे

सेंचुरी वाईन्सचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सन्मान


स्थैर्य, बारामती, दि. ०६ ऑगस्ट : गेल्या २५ वर्षांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि समाधानी ग्राहक हीच आमची खरी ओळख असून, ग्राहकांना उत्तम दर्जा आणि गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन सेंचुरी वाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन हनुमंत तांबे यांनी केले. पिंपळी (ता. बारामती) येथे कंपनीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वास, प्रेरणा आणि पाठिंब्यामुळेच व्यवसाय यशस्वी झाला आहे व यापुढेही नवनवीन ग्राहक जोडले जातील, असे मत संचालक संदीप तांबे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास संचालिका आशाताई तांबे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बारामती संघचालक दिलीप शिंदे, गोदिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि राज्यातील व इतर राज्यातील वाइनरी उत्पादक उपस्थित होते.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येऊनही हनुमंत तांबे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर व्यवसायात गरुडझेप घेतली आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी गुणवंत कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबीयांसहित सन्मान करण्यात आला. तसेच, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीनिवास परेश वाघमोडे, उत्कर्षा डोंबाळे, हर्षदा जमदाडे, कुणाल जमदाडे आणि साहसी बाईक राईडर रोहित शिंदे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले, तर सलीम सय्यद यांनी गायनाने उपस्थितांची मने जिंकली.


Back to top button
Don`t copy text!