डॉ. प्रणव देशमुख शेंडे यांचे स्पृहणीय यश


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२१ । फलटण । येथील प्रख्यात हृदय रोग तज्ञ डॉ. जे. टी. पोळ आणि डॉ. सौ. सुनीता पोळ यांचे कनिष्ठ जावई (डॉ. सौ. देवयानीचे पती) डॉ. प्रणव देशमुख शेंडे यांनी डी. एम. (कार्डीओलॉजी) ही वैद्यक शास्त्रातील या विभागातील अत्युच्च पदवी अत्यंत लहान वयात व पहिल्या प्रयत्नात प्राप्त केली आहे.

या स्पृहणीय यशाचे मानकरी होताना डॉ. प्रणव यांनी कार्डीओलॉजी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेले डॉ. ए. डी. काटदरे, मेजर जनरल डॉ. सुशीलकुमार मलाणी, डॉ. श्रीदेवी यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभल्याचे आदरपूर्वक नमूद केले आहे.
डॉ. प्रणव यांच्या या दैदिप्यमान यशाचे डॉ. पोळ व डॉ. देशमुख शेंडे कुटुंबीय आणि मित्र परिवाराने मुक्त हस्ते कौतुक केले आहे. कृतकृत्यता व कृतज्ञता यांचा हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल.


Back to top button
Don`t copy text!