स्थैर्य, नागपूर, दि.२५: शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग होता. उत्तर नागपूरातही संसर्गाची लागण मोठ्या प्रमाणावर होती. या भागात संकल्प स्वयंसेवी संस्थेने कोविडबाधितांसाठी केलेले काम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
आज संकल्प संस्थेच्यावतीने उत्तर नागपुरातील अशोक नगर व आशीनगर येथील सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्राला भेट दिली. तसेच आशीनगरातील इस्लामिक कल्चर सेंटर व कपिलनगर येथील भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या संकटकाळात अनेक स्वंयसेवी संघटना, वैयक्तीक दानदात्यांनी जीवनावश्यक वस्तु, अन्न वितरण, औषधे यांची मोठ्या प्रमाणावर मदत केली. उत्तर नागपूर क्षेत्रात गेल्या वर्षभरात कोरोनाच्या काळात संकल्प संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम केले. त्यामध्ये गरजूंना 14 लाख अन्नपाकिटे वाटली. कपिलनगर, आशीनगर, अशोकनगर येथे 100 बेडची संकल्प क्वारंटाईन केंद्र उभारली आहेत. बाधितांना दिलासा देणारे समाजकार्य ही संस्था करत आहे.
संकल्प स्वयंसेवी संस्था व गुरूनानक दरबार समितीच्या संयुक्त विद्यमाने अशोकनगर येथे क्वारंटाईन केंद्र उभारण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या कोविडबाधितांना येथे ठेवण्यात येते. या ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस उपलब्ध आहे. तसेच तेथील रूग्णांना कोविड उपचार, औषधोपचार व जेवण देण्यात येत आहे. खुशकंवल सिंघ, टिंकू धीर, कुलविंदर सिंघ सबरवाल, सतविंदर सिंघ, सरबजीत सिंघ हे या केंद्राची व्यवस्था करत आहेत. सौम्य लक्षण असलेल्या कोरोनाबाधितांनी या क्वारंटाईन सेंटरला दाखल होण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले.
आशीनगर येथील क्वारंटाईन सेंटरसाठी इमरान खान, मोहम्मद बिलाल, इब्राहीम टेलर, जलील अंसारी, असलम खान, माहिर नागपुरी, हाफिज बासित, अकील अफसर, इरशाद शेख हे जबाबदारी पार पाडत आहेत.
कपिलवस्तू बुध्दविहारातील क्वारंटाईन सेंटरसाठी तुषार नंदागवळी, मनीष भगत, आशीष वानखेडे, अमोल रंगारी, आशीष पोटपोसे , श्रमित पोफरे, आदेश रंगारी, राकेश माटे, पवन धमागाये, धमेश गनेर, विनोद जांभूलकर, अनिल सहारे परिश्रम घेत आहेत.