
दैनिक स्थैर्य । दि. ०१ फेब्रुवारी २०२३ । फलटण । श्री सद्गुरु हरिबुवा महाराज पुण्यतिथी उत्सव गुरुवार दि. 26 जानेवारी रोजी प्रारंभ झाला आहे. शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी अखेर हा सप्ताह संपन्न होणार आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. आज दि. ०१ फेब्रुवारी पासून सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत पंचक्रोशीतील सर्व सांप्रदायिक भजनी मंडळ यांचे भजन दुपारी तीन ते पाच दादा महाराज भजनी मंडळ फलटण यांचे भजन सायंकाळी साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत ओम दत्त चिले ओम भजनी मंडळाचे सुश्राव्य असे भजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 02 फेब्रुवारी रोजी भागवत कथा समाप्ती दहा ते बारा काल्याचे किर्तन श्री अवधूत भजनी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर दुपारी १२ वाजता श्रींची आरती व उपस्थित भावी भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. ०३ फेब्रुवारी रोजी श्री सद्गुरु हरिबुवा महाराजांच्या प्रतिमेची व पादुकांची पालखीतून टाळ मृदंगाच्या गजरात नगरप्रदक्षिणा व दिंडी श्री अवधूत भजनी मंडळ यांच्या सहकार्याने होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.