दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । गुहागर । बौद्धजन सहकारी संघ, तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी गाव विभाग यांच्या अंतर्गत संस्कार समिती या समितीच्या विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये सायंकाळी चार ते सहा वाजता माननीय कार्याध्यक्ष विश्वनाथ कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावास प्रवचन मालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे, सदर कार्यक्रमाला विश्वस्त राजेश पवार, उपाध्यक्ष संतोष दामले, संस्कार समिती चिटणीस सुभाष जाधव, संघाचे अध्यक्ष माजी सैनिक माननीय सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी महेंद्रजी मोहिते साहेब यांनी पेलवली तर धार्मिक विधीची धुरा संस्कार समितीचे अध्यक्ष शशिकांत जाधव गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचलली, स्वतंत्र सैनिक आणि स्वागताध्यक्ष आदरणीय सुनील जाधव साहेब यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून प्रमुख वक्ते प्राध्यापक एल. एन. गजभिरे सर यांची सभागृहास ओळख करून दिली, प्रमुख वक्ते या नात्याने पहिले पुष्प गुंफताना प्राध्यापक एल. एन. गजभिरे सर यांनी “भगवान गौतम बुद्ध आणि वर्षावास” या विषयावर उपस्थितांस संभोधीत करताना प्रत्येक घटना आणि त्याचा प्रसंगाचे सविस्तर विवेचन करून मार्गदर्शन केले आणि आपल्या गोड वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
प्रथमच वर्षावास कार्यक्रमाची सुरुवात होत असल्याने लोकांमध्ये चैतन्य व चेतना निर्माण झाल्याने मोठ्या संख्येने सभासदांनी हजेरी लावली होती, विभाग अधिकारी आजी-माजी कार्यकर्ते बौद्धचार्य, बौद्धचार्या आणि बौद्ध उपासक उपासिका यांची प्रचंड गर्दी या कार्यक्रमास उपस्थित होती या सर्वांच्या उपस्थितीत हा मंगल असा कार्यक्रम साजरा झाला त्यानंतर बौद्धजन सहकारी संघाचे चिटणीस विश्वास जाधव यांनी सर्वांचे आभार मानून कार्याध्यक्ष विश्वनाथ कदम साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात आजच्या दिवसाचे महत्त्व पटवून देत अशाच प्रकारचे कार्यक्रम यापुढेही सातत्याने घेत राहू अशी ग्वाही देऊन सर्वांचे आभार व्यक्त केले आणि शेवटची गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.